असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळणार 3000रु दर महा,असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी |Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana

  प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

आज आपण अशा एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ज्यामध्ये आपल्याला तीन हजार रुपये पेन्शन दर महा मिळू शकते या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आपण या article मध्ये बघणार आहोत या योजनेची वैशिष्ट्य पात्रता नाव नोंदणी कशी करायची आणि फायदे तेव्हा सुरू करूया आजचा article ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना भारत सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सुरू केली आहे ज्यांना कुठल्याही प्रकारचा पेन्शन मिळत नाही.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना फायदे

यात मजूर वर्गातील कामगार फेरीवाले बांधकाम क्षेत्रातील कामगार रोजंदारीवर काम करणारे मजूर भूमिहीन शेतकरी व इतर अनेक कामगारांचा समावेश होतो या योजनेत 18 ते 40 वयोगटातील अर्जदारांना वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत 55 ते 200 रुपये दर महा भरावे लागतात आणि जेवढे रक्कम आपण गुंतवता तेवढीच रक्कम सरकारकडून गुंतवली जाते अर्जदाराच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 3000 पेन्शन मिळू शकते आणि ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होते.

पोर्टल वर जाऊन नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वापरा: https://maandhan.in/auth/login

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही योजना फक्त असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीच आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपलं वय 18 ते 40 च्या दरम्यान असावा लागतो त्यानंतर आपलं मासिक उत्पन्न हे 15000 किंवा त्यापेक्षा कमी असावा लागतो.

आयकर भरणारे किंवा राष्ट्रीय पेन्शन योजना कर्मचारी राज्य विमा योजना किंवा प्रॉव्हिडंट फंडात खाता असणाऱ्या व्यक्तींना या योजनेत सहभागी होता येत नाही.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना Document

या योजनेत मुख्यत्वे तीन प्रकारची कागदपत्र आपल्याला लागतात सर्वप्रथम आपल्याजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर मोबाईल नंबर जो आपल्या आधार कार्डशी link जोडला गेलेला असेल आणि त्याचबरोबर आपलं बँक खाते असणे आवश्यक आहे मात्र याबाबतीतही आपलं आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी जोडले गेलेला असला पाहिजे या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी पहिला पर्याय म्हणजे सरकारने यासाठी तयार केलेल्या खास पोर्टलवर जाऊन आपण नोंदणी करू शकता.

त्यासाठी लागणारे लिंक मध्ये दिलेली आहे ती आपण पाहू शकता आणि दुसरा पर्याय म्हणजे आपण जवळच्या सीएससी म्हणजे कॉमन सर्विस सेंटर केंद्राला भेट देऊन सुद्धा नाव नोंदणी करू शकता या योजनेचा सर्वात पहिला लाभ म्हणजे जर लाभार्थ्याने साठ वर्षापर्यंत नियमित रक्कम भरली तर त्याला साठ वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन म्हणून मिळतील.

या योजनेत सहभागी झाल्याच्या तारखेपासून दहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत लाभार्थी या योजनेतून बाहेर पडत असेल तर त्याला त्याने भरलेल्या रकमेचा हिस्सा आणि बचत खात्या द्वारे मिळणारे व्याज एवढे रक्कम परत केली जाईल जर लाभार्थी दहा वर्षांनंतर पण साठ वर्षे पूर्ण होण्याआधी बाहेर पडला तर त्याने भरलेली रक्कम आणि पेन्शन फंडाद्वारे मिळणारे व्याज किंवा बचत खात्याद्वारे मिळणारे व्याज यापैकी जे जास्त असेल ते परत मिळेल निवृत्तीवेतनाच्या प्राप्ती दरम्यान एखाद्या पात्र लाभार्थी चा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला पेन्शनच्या 50% रक्कम परत मिळेल.

जर एखाद्या पात्र लाभार्थ्याने नियमित योगदान दिले असेल आणि त्याचे वय 60 पूर्ण होण्याच्या आधी कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्याच्या जोडीदारास नियमित पैसे देऊन योजना सुरू ठेवता येईल किंवा अशा लाभार्थ्याने जमा केलेले रक्कम आणि पेन्शन फंडाद्वारे मिळणारे व्याज किंवा बचत खात्या द्वारे मिळणारे व्याज यापैकी जे जास्त असेल ते घेऊन योजनेतून बाहेर पडता येईल.

लाभार्थी आणि त्याच्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर जमा रक्कम योजनेच्या फंडात जमा होईल कारण या योजनेचा लाभ फक्त लाभार्थी आणि त्याच्या जोडीदारास मिळू शकतो इतर वारसांना मिळू शकत नाही तेव्हा मंडळी लवकरात लवकर या योजनेत नाव नोंदणी करा आणि या योजनेत लाभार्थी व्हा आणि हो

 

Leave a Comment